'पुरुष रात्री लुंगी नेसून भेटू शकतात पण...'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी एक ट्विट केले असून, त्या ट्विटमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी केलेलेे ट्विट व्हायरल होत आहे.

जयपूरः राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी एक ट्विट केले असून, त्या ट्विटमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी केलेलेे ट्विट व्हायरल होत आहे.

जयपूरमध्ये बिडला येथे अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान वसुंधरा राजे यांनी पुरुष मंत्री, नेते यांच्याप्रमाणे महिला मंत्री आणि नेत्या कार्यकर्त्यांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत, यामागील कारण त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, 'माझ्या विरोधकांनी आणि माझ्यावर टीका करणाऱ्यांनी अफवा पसरवली आहे की, मी रात्री 10 नंतर भेट घेत नाही. पण, त्यांना समजायला हवे की, पुरुष आणि महिला नेत्यांच्या कामात फरक असतो. पुरुष रात्री लुंगी नेसून कोणालाही भेटू शकतात, मात्र महिला रात्री लोकांना भेटू शकत नाहीत. कारण त्यांना मर्यादा पाळाव्या लागतात. माझे विरोधक फक्त नकारात्मक गोष्टी पसरवतात. पण मी त्यामुळे मागे हटणार नाही आणि लोकांची सेवा करणे सोडणार नाही. तुम्हीही अशा गोष्टींची काळजी करू नका. सेवा करायची असेल तर अशा आव्हानांचा सामना करावाच लागेल.'

दरम्यान, वसुंधरा राजे यांनी ट्विटरवरून भाषणातील काही मुद्दे ट्विट केले आहेत. ट्विट केल्यानंतर त्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vasundhara raje tweet viral on social media about difference between men and women while working