
Indian Parliament members casting votes in Vice President Election 2025 between NDA candidate CP Radhakrishnan and INDIA Bloc candidate Justice Sudarshan Reddy.
esakal
Summary
भारताच्या १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज संसदेत मतदान होणार असून NDAचे सी.पी. राधाकृष्णन व INDIA ब्लॉकचे जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात सामना आहे.
७८१ खासदार मतदानास पात्र असून काही पक्षांनी मतदानातून दूर राहिल्यामुळे मतदारांची संख्या अंदाजे ७६७ राहणार आहे.
निकालाची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा किंवा बुधवारी सकाळी होण्याची शक्यता आहे.
भारताच्या १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज संसद भवनात मतदान होणार आहे. एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत आहे. १६ वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक होत आहे.