esakal | ‘व्हिक्टोरिया मेमोरियल’ला नेताजींचे नाव देणार?
sakal

बोलून बातमी शोधा

victoria-memorial

पश्‍चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२४ व्या जयंतीची जय्यत तयारी सुरू असताना केंद्र सरकारकडून व्हिक्टोरिया मेमोरियलचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस असे करण्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. तशा वार्ताही सोशल मीडीयावर व्हायरल असताना नेताजींच्या कुटुंबीयांनी मात्र विरोध केला आहे.

‘व्हिक्टोरिया मेमोरियल’ला नेताजींचे नाव देणार?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२४ व्या जयंतीची जय्यत तयारी सुरू असताना केंद्र सरकारकडून व्हिक्टोरिया मेमोरियलचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस असे करण्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. तशा वार्ताही सोशल मीडीयावर व्हायरल असताना नेताजींच्या कुटुंबीयांनी मात्र विरोध केला आहे. 

ब्रिटिश राजवटीत राणी व्हिक्टोरिया यांच्या सन्मानार्थ बांधलेल्या व्हिक्टोरिया मेमोरियलचे नाव बदलून ते नेताजी सुभाषचंद्र बोस करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा गेल्या दोन तीन दिवसापासून आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२४ यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता. २३) नेताजींच्या जीवनपटावर प्रकाश टाकणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन व्हिक्टोरिया मेमोरिअल येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे नामकरणाच्या वृत्ताला जोर आला आहे. याबाबत मेमोरियलची देखभाल करणाऱ्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आणि नेताजींच्या कुटुंबीय देखील यापासून अनभिज्ञ आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नामकरणाबाबत सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील चंद्र बोस यांना अनेकांकडून विचारणा झाली आहे. ते म्हणाले, व्यक्तिशः: आपला अशा नामकरणाला विरोध आहे.जर नेताजींचा सन्मान करायचा असेल तर त्यांच्या नावाने वेगळे स्मारक उभारायला हवे. ब्रिटिशांनी भारतीयांवर २०० वर्षे राज्य केले आहे आणि ही इतिहासातील वस्तुस्थिती आहे. नेताजींचे पणतू अभिजित रे म्हणाले, की व्हिक्टोरिया इमारतीला नेताजींचे नाव देण्याची आवश्‍यकता नाही आणि हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे. 

Video:हत्तीच्या अंगावर फेकली पेटती टायर; अमानुष प्रकाराने हत्तीचा मृत्यू

ब्रिटिश पुतळे...
बांगला काँग्रेसचे अजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली १९६० च्या दशकात बंगालमध्ये बिगर कॉंग्रेस युनायटेड फ्रंटचे सरकार स्थापन झाले तेव्हा संपूर्ण शहरातील ब्रिटिश राज्यकर्त्यांचे पुतळे काढून टाकण्यात आले आणि ते बराकपूर येथील लॅटबॅगन येथे पुरण्यात आले. 

'लशीच्या यशात माझं काय श्रेय नाही'

माहितीपट
नेताजींवरील दोन माहिती पटांचे उद्या (ता. २३) प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. आशिष मुखर्जी दिग्दर्शित ‘द फ्लेम बर्न्स ब्राइट’ आणि अरुण चौधरी दिग्दर्शित केलेला ‘नेताजी’ हे दोन माहितीपट दाखविले जातील.

Edited By - Prashant Patil