विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Tamil Nadu government formation राज्यपालांची तिसऱ्यांदा भेट घेऊन टीव्हीकेनं सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र पाठिंबा दिलेल्या लहान पक्षांनी ऐनवेळी घेतलेल्या भूमिकेनं पुन्हा एकदा विजयसमोर बहुमत जुळवण्याचं आव्हान निर्माण झालंय.
Vijay Faces Fresh Setback in Power Battle

Vijay Faces Fresh Setback in Power Battle

Esakal

Updated on

Tamil Nadu government formation crisis deepens for Vijay and TVK तामिळनाडूतील सत्तास्थापनेचा पेच सुटण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीयेत. टीव्हीके १०८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा आकडा मिळवता आलेला नाही. तसंच ज्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे त्यातील दोन पक्षांनी ऐनवेळी भूमिका बदलल्यानं नवा प्रश्न निर्माण झाला आहे. टीव्हीकेचे नेते विजय यांनी राज्यपालांची तिसऱ्यांदा भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर काही वेळातच पाठिंबा दिलेल्या व्हीसीकेकडून उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली गेली. तर आययूएमएलने वेळ आल्यावर निर्णय घेऊ अशी भूमिका घेतलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com