esakal | विजय मल्या आता म्हणतोय, 'सगळं कर्ज फेडतो'

बोलून बातमी शोधा

vijay mallya ready for pay all kingfisher airlines loans twitter

किंगफिशर एअरलाईन्सवरील कर्जाची 100 टक्के परतफेड करण्याची 'ऑफर' मल्ल्याने दिली आहे.

विजय मल्या आता म्हणतोय, 'सगळं कर्ज फेडतो'
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : 'कोरोना'मुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी आपली कर्ज परतफेडीची 'ऑफर' स्वीकारावी अशी मागणी फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने केली आहे. किंगफिशर एअरलाईन्सवरील कर्जाची 100 टक्के परतफेड करण्याची 'ऑफर' मल्ल्याने दिली आहे. विविध बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या नऊ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात तपास यंत्रणा मल्ल्याच्या मागावर आहेत. सध्या मल्ल्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. ब्रिटनने मल्ल्याचे भारतात हस्तांतरण करावे, अशी मागणी भारताने केली आहे. त्यावर लंडनमध्ये न्यायालयात खटला सुरू आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'अर्थमंत्री माझी ऑफर स्वीकारतील'
'मी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या 100 टक्के परतफेड करण्यास तयार असल्याचे अनेक वेळा भारत सरकार आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) सांगितले. मात्र तपास यंत्रणा याचा स्वीकार करायला तयार नाहीत. 'कोरोना'मुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत तरी अर्थमंत्री माझी ऑफर स्वीकारतील', असे मल्ल्याने म्हटले आहे. भारत सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 'लॉकडाऊन' केले आहे. मी या निर्णयाचा आदर करतो. माझ्या सर्व कंपन्यांनीदेखील आपले कामकाज पूर्णपणे थांबवले आहे. आम्ही कर्मचाऱ्यांची कपात केलेली नाही, मात्र सरकारने यात आमची मदत केली पाहिजे, असेही मल्ल्याने ट्‌विटमध्ये म्हटले आहे. सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, एकमेकांपासून अंतर राखावे. मी आणि माझे कुटुंब याचे पालन करतो आहे, असेही पुढे मल्ल्याने म्हटले आहे. सध्या मल्ल्याच्या भारताकडे हस्तांतरण करण्यासंदर्भातील खटला इंग्लंडमध्ये सुरू आहे.


विजय मल्ल्यावर देशातील बँकांची साडे नऊ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बड्या बँकांचा समावेश आहे. सध्या कोरोना व्हायरसचे संकट भारतावरच नव्हे तर जगावर ओढवले आहे. मुळात त्याचा परिणाम आगामी काळात बँका आणि देशातील इतर आर्थिक उलाढालीवर होणार आहे. त्यामुळचं या काळात मल्ल्याने संपूर्ण कर्ज फेडण्याची तयारी दर्शवलीय. यावर अर्थमंत्र्यांनी विचार करावा, असंही मल्ल्यानं म्हटलंय.