

Thalapathy Vijay Opposition Leader Tamil Nadu bjp political strategy
esakal
Vijay TVK party latest news : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सुपरस्टार थलपती विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने राजकीय पदार्पणातच सरकार स्थापन करण्याची संधी चालून आल्यामुळे राज्याचे राजकारण अनपेक्षितपणे ढवळून निघाले आहे. ‘टीव्हीके’च्या विजयाने एकीकडे द्रमुक आणि काँग्रेसची युती संपुष्टात आणली आहे, तर दुसरीकडे भाजपशी युती असलेल्या अण्णाद्रमुकलाही विजय यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्याचे विनासायास श्रेय मिळविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या हाती अप्रत्यक्षपणे तमिळनाडूच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल आला आहे.