esakal | गर्लफ्रेंडसाठी मंत्राचा वापर, व्यावसायिकाला 43 लाखाला गंडवलं
sakal

बोलून बातमी शोधा

गर्लफ्रेंडसाठी मंत्राचा वापर, व्यावसायिकाला 43 लाखाला गंडवलं

गर्लफ्रेंडसाठी मंत्राचा वापर, व्यावसायिकाला 43 लाखाला गंडवलं

sakal_logo
By
नामदेव कुंभार

गुजरातमधील अहमदाबादच्या एका व्यावसायिकाला मांत्रिकाने तब्बल 43 लाख रुपयांना गंडवलं आहे. अजय पटेल असं त्या व्यावसायिकाचं नाव आहे. अजय पटेल याचं अहमदाबादमध्ये इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. मागील काही दिवसांपासून अजय पटेल याच्यासोबत त्याच्या प्रेयसीने बोलणं सोडलं होतं. निराश झालेल्या अजय पटेल यांनं तिच्यासोबत बोलण्यासाठी अनेक फंडे वापरले मात्र, काहीच उपयोग झाला नाही. अखेर अजय पटेल यानं मांत्रिकाची मदत घेतली अन् 43 लाख रुपयांना फसला.

अहमदाबादमधील मकार्बा भागात अजय पटेल याचं दुकान आहे. प्रेयसीने बोलणं सोडल्यामुळे अजय निराश झाला होता. प्रेयसीला बोलण्यासाठी अजय काहीही करायला तयार झाला होता. मनात प्रश्नाचं काहूर माजलं असतानाच अजयची एका तांत्रिकाची भेट झाली. त्या तांत्रिकाचं नाव अनिल जोशी असं आहे. एका मित्राच्या साह्यानं अजय पटेल आणि अनिल जोशी यांची ओळख झाली. तंत्र-मंत्राच्या साह्यानं तुझ्या आयुष्यात प्रेयसी परत आणतो असं अनिल जोशी या मांत्रिकानं अजय पटेल याला सांगितलं होतं. अजयही त्याच्या भूलथापाला बळी पडला.

हेही वाचा: गॅस सिलिंडर पुन्हा महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

अनिल जोशी या मांत्रिकानं त्यानंतर विविध तंत्र मंत्राची नावे सांगत अजय पटेलकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. अजय पटेल याने दिलेल्या माहितीनुसार, मे 2020 मध्ये 11,400 रुपये दिले. त्यानंतर सतत अनिल जोशी याला पैसे दिले. असे आतापर्यंत अनिल जोशी याला 43 लाख रुपये दिले आहेत. तांत्रिकाला पैसे दिल्यानंतरही अजयची समस्या मार्गी लागली नाही. त्यानंतर अजयने अनिल जोशीच्या विरोधात सरखेज पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. Ahmedabad Mirror ला अजय पटेल याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांत पुरव्यासह तक्रार नोंदवली आहे. जवळपास 400 ऑडियो रिकॉर्डिंगचा यामध्ये समावेश आहे. तसेच पैसे ट्रान्सफर केल्याचे पुरावेही आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये तांत्रिकाची पत्नी पत्नी गुरु धर्माजी हिचाही समावेश आहे.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांसाठी खास योजना; लाखोंच्या हमीसाठी अशी करा नोंदणी

दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेत नसल्याचा आरोपही अजय याने केला. पुरव्यानंतरही गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप अजयने पोलिसांवर केला. गुन्हा दाखल केल्यानंतर सरखेज पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

loading image
go to top