Viral Video: निसर्गाची करणी आणि जमिन फोडून वाहू लागलं पाणी

सोशल मीडियावरचा हा जमिनीतुन वर येणाऱ्या धो-धो पाण्याचा व्हिडीओ पाहून लोक अचंबित झाले आहेत.
Viral Video
Viral VideoEsakal

सोशल मीडियावर सतत एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण पोट धरून हसतो, तर यातील काही व्हिडीओ असे असतात की ज्यांना पाहून आपण आपल्या बुध्दीला ताण देऊन विचार करू लागतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्याला खडकांमधून पाणी बाहेर येत असल्याचे दिसत आहे. या पाण्याचा प्रवाह इतक्या जोरात  आहे की तो पाहून हे पाणी नेमके कुठून येत आहे, असा प्रश्न लोकांना पडला आहे.सोशल मीडियावरचा हा जमिनीतुन येणाऱ्या धो धो पाण्याचा व्हिडीओ पाहून लोक अचंबित झाले आहेत. हा अचंबित करणारा व्हिडिओ लोक आपल्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

व्हिडिओमध्ये काय दिसते आहे ?

जमिनीच्या आतुन खडकांमधुन एका ठिकाणाहून मोठ्या प्रवाहाने पाणी बाहेर येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक पूर्णपणे अचंबित झाले आहेत. 

व्हायरल व्हिडीओमध्ये खडकांमधून पाणी बाहेर येत असल्याचे दिसत आहे. पाण्याला हा इतका वेग कुठून येतोय, असा प्रश्न लोकांना पडला आहे. सोशल मीडिया यूजर्स पूर्णपणे अचंबित झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लोक त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

व्हायरल व्हिडिओ nakkas.gumus.el.sanatlari नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स मिळवले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने कमेंट करताना हा चमत्कार असल्याचे लिहिले आहे. दुसरीकडे, आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, असे दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com