Viral Video: चक्क अस्वल खेळू लागला घसरगुंडी...

हा व्हिडीओ एका बर्फाळ प्रदेशातील आहे.
Viral Video
Viral VideoEsakal

हा व्हिडीओ एका बर्फाळ प्रदेशातील आहे. या व्हिडीओ अस्वल एका पार्कमधील घसरगुंडी चढून मस्त लहान मुलांसारखी उलटी घसरगुंडी खेळतांना आपल्या दिसणार आहे. सुरूवातीला अस्वल अगदी हळूहळू घसरगुंडीवर चढले आणि नंतर आपल्या शरिराचा योग्य तोल सांभाळत घसरगुंडीवरून खाली घसरत येण्याचा प्रयत्न केला.

अस्वलाचा हा अतिशय गोंडस आणि गंमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्विटर "Buitengebiden" या नावाच्या अकाउंटने 30 सेकंदाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

हा व्हिडिओ  टाकतांना  कॅप्शनमध्ये "घसरगुंडीवर अस्वल" असे लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक मस्त सकारात्मकपणे कमेंट्स करून व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com