कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय जवान सज्ज : लष्कर प्रमुख

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 September 2020

ह दौऱ्यात अनेक ठिकाणी भेट दिली.  अधिकारी आणि जेसीओजसोबत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. जवानांचे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. या परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडून देशासमोर नवे संकट उभारु नये, याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, असेही लष्कर प्रमुखांनी म्हटले आहे.  

लेह-लडाख नियंत्रण रेषेवरील तणावपूर्ण परिस्थितीची लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या चीनला इशारा दिलाय.  एएनआयला दिलेल्या मुलाखतीत नरवणे म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेसाठी पर्याप्त फौजफाटा सीमारेषेवर तैनात करण्यात आला आहे. चीनला लागून असलेल्या भागात सैन्य डोळ्यात तेल घालून पाहरा देत असून त्यांच्यात उत्साह आणि उर्मी दिसून येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने भारताबरोबरील चर्चा गांभीर्याने करावी

लष्कर प्रमुख म्हणाले की, लेह दौऱ्यात अनेक ठिकाणी भेट दिली.  अधिकारी आणि जेसीओजसोबत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. जवानांचे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. या परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडून देशासमोर नवे संकट उभारु नये, याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावलेले आहे. कोणत्याही प्रकारचा सामना करण्यासाठी ते तयार आहेत, अशा शब्दांत त्यांनी चीनसोबत दोन हात करण्याची भारताची तयारी असल्याच्या गोष्टीवर जोर दिला. भारतीय लष्करी जवान आणि अधिकारी जगात भारी आहेत.

जगाचाही आमच्यावर विश्‍वास, लोकशाही मूल्यांना आम्ही बांधील - पंतप्रधान मोदी

लष्करासह संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतो, असेही लष्कर प्रमुखांनी यावेळी सांगितले. लष्कर प्रमुखांनी गुरुवारी सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी खास दौरा केला. आज ते दिल्लीला परतणार आहेत. पूर्व लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीत चुशूल सेक्टरसमोर  चीनने फौजफाटा वाढवला आहे. चीनच्या हालचालीनंतर भारतीय लष्करही सज्ज झाले असून भारतीय लष्करानेही सुरक्षा वाढवली आहे. वेळप्रसंगी चीनचा सामना करण्याची संपूर्ण तयारी भारताने केली असून चीनच्या डावाविरोधात भारतही आक्रमकपणे चाली खेळताना दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: visiting different places in leh and ladakh army chief says india ready to deal with any situation at lac