VK Pandian BJD Naveen Patnaik
VK Pandian BJD Naveen PatnaikEsakal

VK Pandian: शपथविधी दिल्लीत भूकंप ओडिशात! नवीन पटनायक यांचे राईट हँडची राजकारणातून निवृत्ती

VK Pandian Quits Politics: 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाबरोबरच बिजू जनता दलाला या लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.

नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. तर तिकडे ओडिशामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बीजेडीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय व्हीके पांडियन यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ते म्हणाले, 'मी सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासात माझ्यामुळे कोणी दुखावले असेल तर मला माफ करा.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाच्या (बीजेडी) लाजिरवाण्या पराभवानंतर व्हीके पांडियन यांनी हा निर्णय घेतला आहे. माजी आयएएस अधिकारी असलेल्या पांडियन यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, 'राजकारणात येण्याचा माझा हेतू फक्त नवीन बाबूंना मदत करण्याचा होता आणि आता मी जाणीवपूर्वक सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हीके पांडियन म्हणाले, बीजेडीच्या पराभवात माझी भूमिका असेल तर मला खेद वाटतो. यासाठी मी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसह संपूर्ण बिजू परिवाराची माफी मागतो.

VK Pandian BJD Naveen Patnaik
NDA Government: नवे सरकार मारणार चौकार? पाच वर्षांत NDA घेऊ शकते 'हे' चार मोठे निर्णय

दरम्यान 4 जून रोजी ओडिशा विधानसभा आणि लोकसभेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पांडियन सार्वजनिकपणे दिसले नाहीत. ५ जून रोजी मुख्यमंत्री पटनायक राज्यपाल रघुवर दास यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी गेले होते, त्यावेळीही पांडियन पटनाय यांच्यासोबत नव्हते. त्याचबरोब नवीन निवास येथे बीजेडी नेत्यांच्या बैठकीतही ते अनुपस्थित होते.

ओडिशात भाजपकडून झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री पटनायक यांनी पांडियन यांच्यावर होत असलेली टीका दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. बीजेडीमध्ये सहभागी झाल्यानंतर पांडियन यांनी 'उत्कृष्ट काम' केल्याचे पटनायक म्हणाले होते.

VK Pandian BJD Naveen Patnaik
Narendra Modi : १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक जिंकली मात्र, तरूणांच्या लग्नाबाबतची PM मोदींची ती इच्छा अपूर्णच राहीली!

2024 च्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाबरोबरच बिजू जनता दलाला या लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. बीजेडीच्या अनेक बड्या नेत्यांना आपले बालेकिल्ले वाचवण्यात यश आलेले नाही.

भाजपने 78 जागा जिंकून अडीच दशके जुन्या बीजेडी सरकारची हकालपट्टी केली. पटनायक यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला विधानसभेच्या केवळ 51 जागा मिळाल्या. काँग्रेसला १४ जागा, तर डाव्या पक्षाला-सीपीआयएमला एक जागा मिळाली. तीन अपक्ष उमेदवारही विजयी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com