
Vote Chori Protest Against ECI: मत चोरीच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला आहे. २५ पक्षांचे ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाले आहेत. मत चोरीचा आरोप करत खासदारांनी घोषणा बाजी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी हा मोर्चा काढला. या मोर्चात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पोलीसांचं बॅरिकेड ओलांडून निघून गेले. तर विरोधी पक्षाचे खासदार संसद भनवाच्या मकरद्वारातून निवडणुक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेनं जात आहेत. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना भोवळ आली. त्यांना पोलिसांच्या बसमध्ये प्रियांका गांधी यांनी सावरलं.