PM Modi Praises SC: मोदींनी केलं सुप्रीम कोर्टाचं कौतुक; ट्विट करत म्हणाले 'स्वागतम्'...

'वोट फॉर नोट' प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आज ऐतिहासिक निर्णय दिला.
Narendra Modi_Supreme Court
Narendra Modi_Supreme Court

नवी दिल्ली : 'वोट फॉर नोट' प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आज ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानुसार विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी तसेच विधेयकांच्या बाजूनं मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या आमदार खासदारांचा बचाव करणारा कायदा रद्द करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार स्वागत केलं आहे. यासाठी चक्क ट्विट करत हा खूपच चांगला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. (Vote for Note PM Modi Praises Supreme Court decision tweeted and said welcome)

सुप्रीम कोर्टानं काय दिलाय निकाल?

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय घटनापीठानं एकमतानं आज हा निकाल दिला. त्यानुसार सन 1998 चा निर्णय रद्द करत खासदार आणि आमदारांना लाचेच्या बदल्यात मतं मिळाल्यास कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणारा कायदा रद्द केला आहे, त्यामुळं आता या गुन्ह्यासाठी लोकप्रतिनिधींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. (Marathi Tajya Batmya)

"नरसिंहरावांच्या निर्णयाचा अर्थ कलम 105/194 च्या विरोधात आहे. त्यामुळं लाचखोरीला संसदीय विशेषाधिकारांचे संरक्षण नाही" असं सरन्यायाधीशांनी हा निकाल देताना म्हटलं आहे. 26 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने 1998 च्या निर्णयाचा आढावा घेतला आहे. (Latest Marathi News)

Narendra Modi_Supreme Court
Chandigarh Deputy Mayor Elections: महापौरपदासाठी झाला होता गैरप्रकार! आता उपमहापौरपदाची निवडणूक भाजपनं जिंकली

मोदींनी केलं निर्णयाचं स्वागत

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरुन सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी म्हटलं की, स्वागतम! सन्माननिय सुप्रीम कोर्टानं हा खूपच चांगला निर्णय दिला आहे. यामुळं स्वच्छ राजकारणाची खात्री मिळेल अन् लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com