
वाघा सीमेवर पाकिस्तानच्या बाजूला मुसळधार पावसामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचले आणि जवानांना पाण्यातच परेड करावी लागली.
पाकिस्तानने भारतावर रस्ता उंचावल्याने पाणी अडत असल्याचा आरोप केला, तर भारतीय बाजूकडे योग्य ड्रेनेजमुळे पाणी साचले नाही.
बीएसएफने स्पष्ट केले की भारतीय परेड स्थळे पाण्यापासून सुरक्षित होती, पण काही सीमाचौक्यांवर पूरस्थिती गंभीर झाली.
वाघा सीमेवर होणाऱ्या दररोज भारत आणि पाकिस्तानच्या लष्काराची परेड होत असते, दरम्यान दैनंदिन परेडपूर्वी पाकिस्तानच्या बाजूला गुडघ्यापर्यंत पाण्यात साचले. त्यामुळे पाकिस्तानी जवानांना पाण्यातच परेड करावी लागली. याचा व्हिडिओ व्हायरल होताच पाकिस्तान भारतावर संतापला आहे. भारताच्या बाजून ग्रॅंड ट्रंक हायवेची उंची वाढविल्यानेच हे पाणी साचल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.