Jodhpur : जलशक्ती मंत्र्यांच्या गावातच पाणीटंचाई - मुख्यमंत्री अशोक गेहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यातील पाणीटंचाईवरून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना धारेवर धरले.
Water issue
Water issuesakal

जोधपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यातील पाणीटंचाईवरून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना धारेवर धरले. जोधपूरचे खासदार शेखावत जलशक्ती मंत्री असूनही त्यांच्याच गावात पाणीटंचाईने लोक त्रस्त झाले आहेत.

Water issue
Ashok Gehlot : शिक्षणात खासगी शिक्षणसंस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण; मुख्यमंत्री अशोक गेहलोत

मात्र, त्याची शेखावत यांना काळजी नाही, अशी टीका गेहलोत यांनी बारमेरमधील एका सभेत बोलताना केली. यापूर्वी, केंद्र जल प्रकल्पांसाठी ९० टक्के निधी पुरवीत असे. आता तो निम्म्यापर्यंत कमी केला आहे,असा दावाही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, की गुजरात, पंजाब आणि हरियाणासारख्या राज्यांतून आम्हाला आमच्या वाट्याचे पाणी मिळू शकते. मात्र, जलशक्ती मंत्र्यांना काही देणेघेणे नाही. राज्य सरकार आता पूर्व राजस्थान कालवा प्रकल्पासारख्या कामांनाही निधी देत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Water issue
Congress-BJP : ‘मुस्लिम लीग’वरून भाजप, काँग्रेस भिडले; भाजपच्या पूर्वजांचा जिनांशी संबंध

संजीवनी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी गैरव्यवहारातील शेखावत यांच्या कथित सहभागावरून गेहलोतांनी टीका केली. नसल्याचे सांगितले. शेखावत यांनी मात्र या गैरव्यवहाराशी संबंध असल्याचा आरोप फेटाळला असून दिल्ली न्यायालयात गेहलोत यांच्याविरुद्ध मानहानीचा खटलाही दाखल केला आहे.

भाजपकडून दिशाभूल

दरम्यान, राज्य सरकारच्या योजनांबद्दल भाजपकडे उत्तर नसून पक्षाकडून काँग्रेसची बदनामी करून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असेही गेहलोत यांनी नमूद केले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणसिंह यांच्याविरुद्धच्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात कोणतीही भूमिका न घेतल्याबद्दलही त्यांनी केंद्रावर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com