esakal | Video : 'भारत बलात्कारांची राजधानी बनलाय; जगभरात बदनामी'
sakal

बोलून बातमी शोधा

wayanad kerala congress leader rahul gandhi statement about rape incidents

केरळ दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी त्यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केलीय.

Video : 'भारत बलात्कारांची राजधानी बनलाय; जगभरात बदनामी'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वायनाड (केरळ) : काँग्रेस नेते राहूल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. वायनाड या  त्यांच्या लोकसभा मतदारसंघात बोलताना त्यांनी आज, केंद्रातील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. सरकार आपल्या मुलींचं बहिणींच रक्षण करू शकत नसल्यामुळं जगभरात भारताची बदनामी झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे एप

काय म्हणाले राहुल गांधी?
केरळ दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी त्यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केलीय. राहुल गांधी मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अशाच एका कार्यक्रमात राहुल यांनी सध्या देशभरात सुरू असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलंय. त्यात राहुल गांधी म्हणाले, 'जगात भारताची ओळख बलात्कारांची राजधानी अशी झाली आहे. भारत आपल्या माता-भगिनींचं रक्षण का करू शकत नाही, असा प्रश्न इतर देश विचारू लागले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपच्या एका आमदाराचा बलात्कार प्रकरणात हात आहे. पण, पंतप्रधान त्यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत.'

आणखी वाचा - उन्नाव पीडितांची प्रियंका गांधींनी घेतली भेट 

अन् राहुल यांना मिळाली अनुवादक 
काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमध्ये असले की त्यांची पंचाईत होते. स्थानिकांशी संवाद साधणं अवघड होतं. एका शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुल गांधींची अशीच पंचाईत झाली होती. त्यावेळी एक मुलगी व्यासपीठावर मोठ्या उत्साहानं आली आणि तिनं तितक्याच उत्साहानं राहुल गांधी यांचं संपूर्ण भाषण अनुवादित केलं. राहुल यांनी या सहकार्याबद्दल तिचे आभारही मानले आहेत. 

loading image