२०१४ नंतर देश अमेरिकेचा गुलाम, काँग्रेसचे नेते अय्यर यांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२०१४ नंतर देश अमेरिकेचा गुलाम, काँग्रेसचे नेते अय्यर यांचा दावा
२०१४ नंतर देश अमेरिकेचा गुलाम, काँग्रेसचे नेते अय्यर यांचा दावा

२०१४ नंतर देश अमेरिकेचा गुलाम, काँग्रेसचे नेते अय्यर यांचा दावा

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. गेल्या सात वर्षांपासून भारत अमेरिकेचा गुलाम बनला आहे. अलिप्ततावादी धोरणाची तर कोठेच चर्चा होत नाही, शांततेबाबतही बोलले जात नाहीअशा शब्दांत अय्यर यांनी मत मांडले आहे.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

भारत आणि रशिया यांच्या संबंधांबाबत आयोजित परिसंवादात बोलताना मणिशंकर अय्यर यांनी मोदी सरकारच्या अमेरिकी धोरणावर टीका केली. ते म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून अलिप्ततावादी धोरणावर चर्चा केली जात नाही. शांततेबाबतही कोणी बोलत नाही. आपण अमेरिकेचे गुलाम होऊन बसलो आहोत. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण चीनपासून बचावात्मक धोरण आखत आहोत. याउलट चीनचे सर्वांत जवळचे मित्र तुम्हीच आहात, असेही अय्यर म्हणाले.

हेही वाचा: ओवैसींनी सांगितलं शिवसेनेचं भविष्य; म्हणाले, '2024 साली शिवसेना नक्कीच...'

यावेळी अय्यर यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात दृढ होणाऱ्या संबंधाबाबत काही प्रश्‍न उपस्थित केले. अय्यर यांच्या मते, ‘‘भारत आणि रशिया यांचे संबंध जुने असून रशियाने भारताला नेहमीच मदत केली आहे. परंतु मोदी सत्तेत आल्यानंतर हे संबंध दुरावले गेले. २०१४ पर्यंत रशियाबरोबरचे संबंध आणि व्यापार हा चांगला होता. परंतु सात वर्षांत हे संबंध बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत.’’

loading image
go to top