
नवरीला घेऊन वऱ्हाडी पळाले, जाणून घ्या लग्नात असं काय घडलं की गोंधळ निर्माण झाला
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका गावात एका लग्न समारंभात अनोखा किस्सा घडला. या लग्नात गोंधळ निर्माण झाला. लग्नात चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे क्षणार्धात आनंदाचे वातावरण बदलले. लोक स्वत:ला वाचवण्यासाठी धावत होते.
वादळी वाऱ्यामुळे शेतात लावलेला तंबू हवेत शेकडो फूट उडून गेला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. सोहळ्याला उपस्थित असलेले लोक वादळी वाऱ्याचा तडाखा बसण्यापासून वाचताना दिसत आहेत. लग्नसमारंभासाठी एका शेतात मंडप टाकण्यात आला होता. यावेळी वावटळ आली आणि मंडप उडाला लोक देखील या वाळवटाचे शिकार झाले.
खरेतर, खरगोन जिल्हा मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या झिरन्या विकास गटातील पुतला गावात राहणाऱ्या भुराची मुलगी गीता हिचे लग्न मांडवी येथील सुभान सिंह यांच्या मुलासोबत निश्चित झाले होते. लग्नाचा दिवस ठरला मात्र एका शेतात मंडप टाकण्यात आला, वऱ्हाड्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. लग्नाचे विधी केले जात होते. मात्र गावात वादळ आले आणि क्षणार्धात वातावरण बदलले.
ज्या शेतात वऱ्हाडी पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तिथे वादळी वाऱ्यामुळे शेतातील मंडप हवेत उडून गेला. इतर वस्तूही चक्रीवादळात उडताना दिसल्या. या वादळापासून वाचण्यासाठी मैदानात उपस्थित वऱ्हाडी धावत होते. (MP News)
चक्रीवादळामुळे लग्नातील अन्न देखील खराब झाले. मंडपही उन्मळून पडला. अशा स्थितीत अस्वस्थ झालेल्या वऱ्हाड्यांना न जेवताच परतावे लागले.