esakal | पश्चिम बंगालमधील एकमेव खरा पक्ष म्हणजे भाजप; पंतप्रधान मोदींचा ममतांवर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

modi

बंगालची परिस्थिती काय आहे याचाही एकदा विचार करा. गेल्या ५०-५५ वर्षांत इथे विकास आणि विश्वास डाऊन झाला आहे.

पश्चिम बंगालमधील एकमेव खरा पक्ष म्हणजे भाजप; पंतप्रधान मोदींचा ममतांवर हल्लाबोल

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजप लवकरच आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरगपूर (Kharagpur) येथील प्रचार सभेत शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. शामा प्रसाद मुखर्जी (Shama Prasad Mukharjee) आणि अशुतोष मुखर्जी (Ashutosh Mukharjee) यांची मुल्यं भाजपच्या डीएनएमध्ये आहेत, त्यामुळे पश्चिम बंगालमधील भाजप (BJP) एकमेव खरा पक्ष आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

मनसुख यांचा मृतदेह आढळलेला त्याच खाडीत आज आणखी एक मृतदेह सापडला

मोदी म्हणाले, बंगालच्या जनतेने ममता दिदींना १० वर्षांसाठी सत्ता दिली. मात्र, याची दहा वर्षे विनाश आणि हिंसेच्या रुपाने त्यांनी परतफेड केली. त्यामुळे बंगालमधील भाजप हा एकमेव खरा पक्ष असून शामा प्रसाद मुखर्जी आणि अशुतोष मुखर्जी यांची मूल्यं भाजपच्या डीएनएमध्ये आहेत, असंही मोदी यावेळी म्हणाले.

दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड करणार मोठी घोषणा

"काल फेसबुकची सेवा ४५ ते ५० मिनिटांसाठी डाऊन झाली तर आपण चिडलो होतो. पण बंगालची परिस्थिती काय आहे याचाही एकदा विचार करा. गेल्या ५०-५५ वर्षांत इथे विकास आणि विश्वास डाऊन झाला आहे. काँग्रेस आणि डाव्यांनी इथे केलेला विनाश तुम्ही पाहिला तसेच तृणमूलने तुमच्या स्वप्नांना उद्ध्वस्त केल्याचंही तुम्ही पाहिलं आहे. गेल्या ७० वर्षांत तुम्ही इथं सर्वांना संधी दिलीत आता आम्हाला पाच वर्षे संधी देऊन पाहा. आम्ही ७० वर्षात राज्याची झालेली हानी भरुन काढू, तुमच्यासाठी आम्ही आमचं बलिदानही देऊ," असंही मोदी यावेळी म्हणाले. 

RSS च्या सरकार्यवाहपदी १२ वर्षानंतर नवीन चेहरा; भय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रय होसबळे 

दरम्यान, पंतप्रधानांनी नुकतच ट्विट केलं होतं त्यात ते म्हणाले होते की, "पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये जनतेला भाजपलाच निवडून आणायची इच्छा आहे. पंतप्रधान मोदी हे तृणमूल काँग्रेसची दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी हे सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांसाठी २७ मार्च ते २९ एप्रिल दरम्यान ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीचा २ मे रोजी निकाल लागणार आहे. 
 

loading image