esakal | मतदान केंद्रावरुन ममतांनी थेट राज्यपालांना केला फोन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjee main.jpg

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एका मतदान केंद्रावर पोहोचताच भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कार्यकर्ते परस्परांत भिडले. परिस्थिती इतकी बिघडली की ममता बॅनर्जी मतदान केंद्रातच अडकल्या.

मतदान केंद्रावरुन ममतांनी थेट राज्यपालांना केला फोन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता- West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान नंदीग्राम मतदारसंघाचे रणांगणात रुपांतर झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एका मतदान केंद्रावर पोहोचताच भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कार्यकर्ते परस्परांत भिडले. परिस्थिती इतकी बिघडली की ममता बॅनर्जी मतदान केंद्रातच अडकल्या. त्यांनी त्वरीत राज्यपाल जगदीप धनखड यांना फोन करुन भाजपचे लोक स्थानिकांना मतदान करु देत नसल्याची तक्रार केली. 

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील परिस्थितीची माहिती देण्यासाठी राज्यपालांना फोन केला. ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाच्या हाती असलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. भाजप कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे आपण मतदान केंद्रातच अडकून पडल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. दुसरीकडे निवडणूक आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करुन नंदीग्राम आणि केशपूर येथील परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. 

हेही वाचा- 'निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून फिरवला का निर्णय?'; प्रियंका गांधींची अर्थमंत्र्यांवर जोरदार टीका

ममता बॅनर्जी यांनी मतदान केंद्रावरुन फोन करुन राज्यपालांना म्हटले की, ते (भाजप कार्यकर्ते) लोक येथील स्थानिकांना मतदान करुदेत नाहीत. सकाळपासून मी याबाबत सांगत आहे. या स्थितीकडे तुम्ही व्यक्तीशः पाहण्याचे आवाहन करते. जे लोक घोषणा देत आहेत, ते सर्व बाहेरचे आहेत. हे सर्वजण उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले आहेत. त्यांना केंद्रीय सुरक्षा दलांची सुरक्षा मिळालेली आहे. 


राज्यपालांनी कारवाईचे दिले आश्वासन
ममतांच्या तक्रारीनंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले. राज्यपालांनी टि्वट करुन म्हटले की, ममता बॅनर्जींनी चिंत व्यक्त केली आहे. मी त्यांना योग्य कारवाई करण्याचा विश्वास दिला आहे. लोकशाही पुढे नेण्यासाठी योग्य पाऊल उचलले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा- 'अमेझिंग! अख्ख्या मंत्रिमंडळालाच...',व्याजदराच्या युटर्नवरून सुब्रमण्यम स्वामींचा टोला

मतदान केंद्राबाहेर कलम 144 लागू
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहेत. यामध्ये नंदीग्राममध्येही मतदान होत आहे. ममता बॅनर्जी मागील पाच दिवसांपासून नंदीग्राममध्ये मुक्काम ठोकून आहेत. काही मतदान केंद्रांवर मतदान रोखल्याची तक्रार आल्यानंतर त्या स्वतः मतदान केंद्रावर पोहोचल्या तिथे ममता बॅनर्जी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. घटनास्थळावर अतिरिक्त केंद्रीय सुरक्षा तैना करण्यात आली आहे. त्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. 
 

loading image