esakal | ''मोदी-शहा दिल्लीचे दोन गुंड''; ममतादीदींची बोचरी टीका

बोलून बातमी शोधा

narendra modi amdi shah mamta banarjee
''मोदी-शहा दिल्लीचे दोन गुंड''; ममतादीदींची बोचरी टीका
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कोलकता- पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोचत असली तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. सहाव्या टप्प्यातील मतदान गुरुवारी सुरू असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाना साधत ‘दिल्लीच्या दोन गुंडांपुढे बंगाल आत्मसमर्पण करणार नाही, असा इशारा दिला.

दक्षिण दिनाजपूरमध्ये आज प्रचारसभेत बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘ मी खेळाडू नाही, पण कसे खेळायचे हे मला चांगले माहीत आहे. याआधी मी लोकसभेतील उत्कृष्ट खेळाडू होते. आमचा बंगाल दिल्लीच्‍या दोन गुंडांपुढे समर्पण करणार नाही. कोरोनाकाळात ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या या प्रचंड सभेवरून ऑनलाइन व्यासपीठावरून टीका झाली. त्याला उत्तर देताना तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी ‘मोदीनिर्मित या संकटाचा विस्फोट झाल्याने भारतीय त्याकडे असाह्यपणे पाहत आहे,’ असे ट्विट केले.

हेही वाचा: पश्चिम बंगालमध्ये वाढली रुग्णसंख्या; कोरोनाचा निवडणुकीशी संबंध नसल्याचा शहांचा निर्वाळा

बंगालमधील निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यातील भ्रष्टाचार, विकास, हिंसा आदी मुद्द्यांवरून ‘ममतादीदीं’वर आरोप करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनीही दुखावलेल्या पायाला प्लॅस्टर बांधून व्हिलचेअरवरून प्रचाराची राळ उडवून दिली आहे. प्रत्येक सभांमध्ये त्या भाजपच्या या दोन नेत्‍यांना लक्ष्य करीत आहेत.

कोरोना हटवा अथवा पदत्याग करा

पंतप्रधानांवर हल्ला करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, देश मोदीनिर्मित संकटाचा सामना करीत आहे. कोरोनावरील उपचारासाठी बाजारात औषध मिळत नाही, याची जबाबदारी मोदीबांबूना घ्यावी लागेल. तुम्हाला औषधे उपलब्ध करून द्यावी लागतील नाही तर तुम्ही पद सोडा. तुम्ही कोरोना नियंत्रित करा अथवा पदाचा त्याग करा, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा: कोरोनाच्या लाटेचे संकट ‘मोदीनिर्मित’; ममता बॅनर्जी

लशीचा दर समान हवा

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या कोरोना लशीच्या दरात तफावत असल्याने ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकावर टीका केली. प्रत्येक ग्राहकासाठी लशीचा दर समान हवा, अशी मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली. भाजपच्या ‘एक देश, एक पक्ष आणि एक नेता’ अशी घोषणा करणारा जीव वीचविण्‍यासाठी ते लशीचा दर समान ठेवू शकत नाही, असे त्या म्हणाल्या. लसीकरणासाठी व्यक्तीचे वय व राहण्याचे ठिकाण याचा विचार न करता प्रत्येक भारतीयाला मोफत लस देण्यावर त्यांनी भर दिला