esakal | ममता, राहुल यांना निवडणुकीत मंदिरांची आठवण; योगी आदित्यनाथ यांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

yogi-adityanath

केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. त्यामुळे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सार्वजनिकरित्या ‘चंडीपाठ’ करून राज्यातील मंदिरांना भेटी द्याव्या लागत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे केली.

ममता, राहुल यांना निवडणुकीत मंदिरांची आठवण; योगी आदित्यनाथ यांची टीका

sakal_logo
By
पीटीआय

बलरामपूर (प.बंगाल) - केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. त्यामुळे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सार्वजनिकरित्या ‘चंडीपाठ’ करून राज्यातील मंदिरांना भेटी द्याव्या लागत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे केली. 

विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांत मंदिरांना भेटी दिल्यावरून त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. प. बंगालमधील पुरूलिया जिल्ह्यातील बलरामपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपचे ‘स्टार प्रचारक’ असलेले योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले, की २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येईपर्यंत देशात अशा प्रकारचा एक पंथ होता, ज्याला साधे मंदिरात जाण्यामुळेही धर्मनिरपेक्षतेला धोका उत्पन्न होत असल्याचे वाटत होते. मात्र, आता बदल झाला आहे. ममता बॅनर्जींनीही मंदिरांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. हा बदल नाही काय? हाच नवीन भारत आहे. प्रत्येक व्यक्तीला ईश्वराकडे जावेच लागते. काँग्रेस नेते राहुल गांधीही निवडणुकांच्या काळात मंदिरात जातात. तेथे त्यांना मंदिरातील पुजारी योग्य पद्धतीने बसायला सांगतो, अशी खिल्लीही त्यांनी उडविली. चंडीपाठ ही हिंदू धर्मातील दुर्गेच्या पूजेसाठीच्या मंत्रांची सर्वाधिक प्राचीन पद्धत समजली जाते. 

शरद पवार राज्य सरकारवर नाराज? दिल्लीत संजय राऊत यांची प्रतिक्रिया

भाजप कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा
केंद्र सरकारच्या विविध योजनांची पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी न केल्याबद्दलही त्यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे आवाहन करतानाच पक्ष सत्तेवर आल्यावर पक्षाच्या राज्यातील कार्यकर्त्यांच्या हत्या करणाऱ्यांना शासन केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

शरद पवारांचा मोठा खुलासा; अनिल देशमुखांकडेच राहणार गृहखाते

बंगालची भूमी ही स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर, श्यामाप्रसाद मुखर्जींची आहे, जिने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. मात्र, हीच भूमी आता तृणमूलचा पाठिंबा असलेल्या गुंड व खंडणीखोरांची बनली आहे. ममतादीदींच्या सरकारचे दिवस आता भरत आले आहेत. मतदार हे सरकार घालविण्याच्या मानसिकतेत असून त्याला आता केवळ ४५ दिवस राहिले आहेत.
- योगी आदित्याथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

Edited By - Prashant Patil

loading image