esakal | आता संसदेबाहेर भरणार मंडई; राकेश टिकैत यांची मोठी घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh_Tikait

भाजप सरकारने देशाची लूट केली आहे. त्यामुळे भाजपला मतदान करू नका. आपला बंगाल वाचवा.

आता संसदेबाहेर भरणार मंडई; राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

West Bengal Assembly election 2021: कोलकाता : नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आता पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. कोलकाता आणि नंदीग्राम येथे संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केलं आहे. 

शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांनीही या महापंचायतीत सहभाग नोंदवला. यावेळी टिकैत म्हणाले, 'संयुक्त किसान मोर्चातर्फे ज्या दिवशी निर्णय घेतला जाईल, त्या दिवशी संसदेसमोर एक बाजार भरवला जाईल. पंतप्रधानांनी कोठेही भाजीपाला विका, असं सांगितलं आहे. त्यामुळे संसदेच्या ठिकाणी जाऊन धान्य विकण्याचं पुढील लक्ष्य आहे. आमच्याकडे साडेतीन लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख शेतकरी आहेत, त्यामुळे आता हे सर्वजण दिल्लीत जाणार आहेत.'

मोदींचा एकच कायदा, देश फुकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचं टीकास्त्र​

नंदीग्राम येथील सभेत बोलताना टिकैत म्हणाले, भाजप सरकारने देशाची लूट केली आहे. त्यामुळे भाजपला मतदान करू नका. आपला बंगाल वाचवा. जर कुणी मत मागायला आलं तर त्यांनी आम्हाला MSP कधी मिळेल असा प्रश्न विचारा, तांदळाची किंमत १८५० रुपये झाली आहे, त्यामुळे मग एमएसपी कधी मिळेल?

भाजपाला मत देऊ नका
टिकैत म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार शेतकरी आणि त्यांच्या आंदोलनाचा कणा मोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे जन-विरोधी सरकार आहे. त्यामुळे त्यांना मत देऊ नका. जर त्यांना मत दिलं तर तुमच्या जमिनी मोठ्या कॉर्पोरेट्स आणि उद्योगांच्या हातात जातील. आणि तुम्ही अडचणीत याल. 

व्हील चेअरवरुन ममतादीदी प्रचाराच्या मैदानात; दुखापतीनंतर पहिलीच रॅली​

भाजप हा धोका देणाऱ्या लोकांचा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही भाजपविरोधात आणि गरीब शेतकऱ्यांसोबत उभे राहण्यांच्या पाठीशी उभे राहू. बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेली किसान महापंचायत म्हणजे कोणत्या एका पक्षाला पाठिंबा देण्यासाठी बोलावण्यात आली नाही. आम्ही कोणत्याही एक विशिष्ट पक्षासाठी मते मागण्यासाठी आलो नाही, हे लक्षात घ्या. आम्ही फक्त बंगालमधील शेतकऱ्यांना भाजपविरोधात लढा सुरू करण्याचे आवाहन करण्यासाठी आवाहन करत आहोत, असं टिकैत यांनी स्पष्ट केलं.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image