esakal | पराभव पचवणं जड जातंय- कैलाश विजयवर्गीय

बोलून बातमी शोधा

kailash vijayvargiya
पराभव पचवणं जड जातंय- कैलाश विजयवर्गीय
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

कोलकाता- 284 जागांचे कल हाती आली असून ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत येणाना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने 202 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजप 77 जागांवर आघाडीवर आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कोलकातामध्ये जल्लोषाला सुरुवात केली आहे. असे असताना भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सुरुवातीच्या कलांवर प्रतिक्रिया दिलीय. 'आताच भाष्य करणे चुकेचे ठरले. संध्याकाळपर्यंत स्थिती स्पष्ट होईल. आम्ही 3 पासून सुरुवात केली होती आणि आता 100 च्या पुढे जात आहोत. आम्ही बहुमताचा आकडाही नक्की पार करु', असं ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: Live : केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

भाजपचे केंद्रीय मंत्री आणि बंगाल सिनेसृष्टीतील मोठं नाव असलेले बाबुल सुप्रियो टॉलीगंज जागेवर पिछाडीवर आहेत. त्यांची तृणमूल काँग्रेसचे अरुप बिस्वास यांच्यासोबत लढत होत आहे. अरुप बिस्वास सध्या सुप्रियो यांच्यापेक्षा 9 हजार मतांनी आघाडीवर आहेत. बाबुल सुप्रियो एक लोकप्रिय गायक राहिले आहेत आणि ते सलग दोनवेळा भाजपच्या तिकीटावर संसदेत निवडुन गेलेत. असे असताना भाजपने त्यांना विधानसभेसाठी मैदानात उतरवले आहे. सुप्रियो यांच्या पिछाडीवर बोलताना विजयवर्गीय म्हणाले की, बाबुल सुप्रिया यांचा पराभव पचवणं जड जातंय.

हेही वाचा: Live: ममतांच्या विजयानंतर शरद पवारांचे ट्विट

भाजपचे दिग्गज नेतेही पिछाडीवर पडताना दिसत आहेत. भाजपची हवा निर्माण करण्यासाठी राज्यसभा खासदार राहिलेले स्वप्न दासगुप्ता तारकेश्वर जागेतून पिछाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलानुसार ते 3 हजार मतांनी मागे आहेत. त्यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसचे रामेंदु सिंहाराय यांनी आव्हान उभे केले आहे. भाजपच्या नेत्या लॉकेट चॅटर्जी सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत. चुनचुरा विधानसभा मतदारसंघात त्यांच्यासमोर तृणमूलच्या असित मजूमदार यांनी आव्हान उभं केलंय.