West Bengal Cash Seizure : २९ कोटींची रोकड, १५ किलो सोने अन् बरंच काही... माजी सरकारी बस चालकाच्या घरी सापडले मोठे घबाड

Illegal Mining Case : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे ₹29 कोटी रोकड आणि 15 किलो सोने जप्त केले. ही कारवाई माजी मंत्री पार्थ चॅटर्जी प्रकरणानंतरची सर्वात मोठी जप्ती मानली जात आहे.
West Bengal Cash Seizure

West Bengal Cash Seizure

esakal

Updated on

Massive Cash and Gold Seized in Birbhum Raid : पश्चिम बंगाल पोलिसांनी बीरभूम जिल्ह्यात किमान २९ कोटी रुपयांची रोकड आणि १५ किलो सोने जप्त केले. ईडीने(ED) चार वर्षांपूर्वी राज्याचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या एका निकटवर्तीयाच्या ठिकाणाहून निधी जप्त केला होता, त्यानंतरची ही बेकायदेशीररीत्या साठवलेली रोकड आणि सोने जप्त करण्याची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. पोलिसांनी सांगितले की, देवचा गावातील मिनार मंडल यांच्या दुमजली घरातून १ किलो वजनाच्या १४ सोन्याच्या विटा आणि प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचे १० सोन्याची बिस्किट जप्त करण्यात आली; ज्यांचे बाजारभावानुसार मूल्य सुमारे २१.५ कोटी रुपये आहे. मिनार मंडल हे पूर्वी सरकारी बस चालक होते आणि आता दगड व्यापारी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com