BJP MLA's Firecracker Remark Sparks Debate
esakal
पश्चिम बंगालमधील भाजप आमदार पापिया अधिकारी यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कालीपूजेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी फटाके फोडल्याने अनेक आजार दूर होतात, असा दावा केला. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावरून टीका होत असून, वाद वाढल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.