esakal | पश्चिम बंगालमध्ये ममतांचीच हवा; BJP आमदाराचा 'तृणमूल'मध्ये प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Soumen Roy

पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर भाजपला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालीय.

पश्चिम बंगालमध्ये ममतांचीच हवा; BJP आमदाराचा 'तृणमूल'मध्ये प्रवेश

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर भाजपला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालीय. कालीगंजमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय (BJP MLA Soumen Roy) यांनी पक्षाला निरोप देत ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. आमदार रॉय यांनी आज कोलकात्यात राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी (Minister Partha Chatterjee) यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress Party) प्रवेश केला. सौमेन यांनी या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कालीगंज मतदारसंघातून तृणमूल उमेदवार तपन देब सिंघा यांचा 94,948 मतांनी पराभव केला आहे.

शिखा मित्रा देखील 'टीएमसी'मध्ये सामील

यापूर्वी पश्चिम बंगाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष (दिवंगत) सोमेन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्राही (Shikha Mitra) 29 ऑगस्ट रोजी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाल्या. या दरम्यान, शिखा यांनी असा दावा केला की, मी 2014 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारपदाचा राजीनामा दिला असला, तरी मी कधीही अधिकृतपणे पक्ष सोडला नाही. त्या पुढे म्हणाल्या, माझ्या पतीला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं, पण मी सक्रिय राजकारणातून ब्रेक घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी मला टीएमसीची सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी विनंती केली होती. त्यांचा हाच साधेपणा आणि व्यक्तिमत्त्व पाहून मी पुन्हा प्रभावित झाले आणि मी विचार केला की, जर मी सक्रिय राजकारणात परतलो, तर मी त्यांच्यासोबत काम करेन, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: पोस्टात पुन्हा मेगा भरती; ग्रामीण भागात 4200 हून अधिक जागा भरणार

यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं शिखा मित्रा यांना कोलकात्यातील चौरंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, मित्रा यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. याबाबत शिखा मित्रा आज म्हणाल्या, भाजप हा जातीयवादी पक्ष आहे आणि माझा त्या पक्षावर अजिबात विश्वास नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा: अफगाणिस्तानात तालिबानचं आज नवं सरकार; मुल्ला बरादर असणार 'प्रमुख'

पोटनिवडणुकीची घोषणा

दरम्यान, निवडणूक आयोगानं आंध्र प्रदेश, ओडिशासह पश्चिम बंगालच्या तीन विधानसभा जागांवर पोटनिवडणूक घेण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बंगालमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये भवानीपूरची जागा देखील समाविष्ट आहे. जिथून, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना निवडणूक लढवायची आहे. 30 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत, तर 3 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होतील.

loading image
go to top