esakal | ममता बॅनर्जींना झटका; ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका आमदाराचा 'रामराम'
sakal

बोलून बातमी शोधा

mamata

गेल्या काही महिन्यांमध्ये 18 हून अधिक आमदारांनी ममतांची साथ सोडली आहे. 

ममता बॅनर्जींना झटका; ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका आमदाराचा 'रामराम'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपने आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत राज्याची सत्ता आपल्याच हातात कशी येईल, याबाबत भाजप प्रयत्नशील आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप आधीपासूनच राज्यातील वातावरण गरमागरम असून अनेक हिंसक घटना देखील घडल्या आहेत. सत्ताधारी तृणमूल पक्षाला रामराम ठोकत अनेक आमदार-खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.यामध्ये ममता बॅनेर्जी यांचे निकटवर्तीय सुवेंदु अधिकारी यांनी देखील भाजपची वाट धरत सध्या ममतांवरच हल्लाबोल सुरु केला आहे. 

हेही वाचा - शेतकरी आंदोलनावर चर्चा करणाऱ्या ब्रिटनला भारताचे उत्तर, 'ऑक्सफर्डप्रकरणी गप्प बसणार नाही'

त्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपला सत्तेचा गड राखू शकतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपचे गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासहित अनेकांनी आधीपासूनच प्रचारात उडी घेत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

आणि आता तृणमूलमधील आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. देबाश्री रॉय असं या आमदारांचं नाव असून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. देबाश्री रॉय या अभिनेत्री असून तृणमूल पक्षाकडून त्या आमदार होत्या. त्यांच्या आधीही अनेकांनी तृणमूलला रामराम ठोकला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच खासदार दिनेश त्रिवेदी यांनी देखील तृणमूलला रामराम ठोकला आहे. 

गेल्या काही महिन्यांत तृणमूल पक्ष सोडलेले आमदार
मिहीर गोस्वामी, बन्सारी मैती, सैकत पंजा, शीलभद्र दत्त, विश्वजीत कंडू, दिपाली विश्वास, शुक्र मुंडा, अरींदम भट्टाचार्य, वैशाली दालमिया, सुवेंदु अधिकारी, सब्यासाची दत्त, अर्जून सिंह, विश्वजीत दास, दुलाल बार, मनिरुल इस्लाम. शुब्रांगशू रॉय,  सोवन चॅटर्जी यांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी तृणमूलला रामराम ठोकला आहे. 

loading image