Mamata Banerjee : NIA करणार पश्चिम बंगालमधील रामनवमी हिंसेचा तपास; उच्च न्यायालयाचे आदेश

NIA
NIAesakal
Updated on: 

कोलकाता (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगालमधील रामनवमी हिंसाचाराची केंद्रीय एजन्सी एनआयएकडून चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमी उत्सवादरम्यान हिंसाचार झाला होता.

NIA
Karnataka Election : अमित शाह यांच्याविरोधात एफआयआर दाखल; 'त्या' विधानामुळे काँग्रेस आक्रमक

जिल्ह्यात दोन गटात झालेल्या हाणामारीत अनेक वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. यासोबतच दुकानांचीही तोडफोड करण्यात आली.

हिंसाचारात पोलिसांच्या काही वाहनांसह अनेक गाड्यांचे नुकसान झाले. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला होता की रामनवमी मिरवणुकीने एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून हल्ला करण्यासाठी परवानगीशिवाय दुसरा मार्ग निवडला होता.

NIA
Solapur Politics: तेव्हा संजयमामा आता राजाभाऊ, जखमी झालेल्या जिल्हाबँकेने धरलंय बाळसं

बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "टीएमसी खोटे बोलत आहे, कारण हा मार्ग चुकीचा नव्हता. हावडा मैदानापर्यंत परवानगी देण्यात आली होती आणि तिथे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग होता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mamata Banerjee demands arrest of Gyanesh Kumar
Sanchita Pradhan Dey withdraws her candidature from the Nandigram Assembly bypoll
Mamata Banerjee Faction Submits New Name and Symbol
Mamata Banerjee group three name symbol options
Marathi News Esakal
www.esakal.com