Abhishek Banerjee attacked in Sonarpur
esakal
सोनारपूर, पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभेतील कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणात सीआयडीने तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना समन्स बजावल्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक घटना समोर (Abhishek Banerjee Attack) आली आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा करत असताना शनिवारी (ता.३०) सोनारपूर येथे स्थानिक नागरिकांच्या एका गटाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.