मोदी आणि शहा गप्प कशामुळे?

पीटीआय
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

हिज्बुल मुजाहिदीन संघटनेच्या दहशतवाद्यासोबत अटक करण्यात आलेले निलंबित पोलिस उपाधीक्षक देविंदर सिंग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल गप्प का, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे.

नवी दिल्ली - हिज्बुल मुजाहिदीन संघटनेच्या दहशतवाद्यासोबत अटक करण्यात आलेले निलंबित पोलिस उपाधीक्षक देविंदर सिंग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल गप्प का, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याविषयी ते म्हणाले, की देविंदर सिंगसारख्या अधिकाऱ्यांना कोण संरक्षण पुरवते आणि कशासाठी पुरवते, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. तसेच पुलवामा हल्ल्यात सिंगची भूमिका आणि त्याने किती दहशतवाद्यांना मदत केली, याची माहिती घेण्यात यावी आणि ती सर्वांसमोर आणायला हवी.

भाजपचा मास्टरस्ट्रोक; केजरीवालांच्या विरोधात यांना उमेदवारी?

तसेच, अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करून जलदगती न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या ट्‌विटद्वारे केली आहे. तसेच, त्यांनी या ट्विटला ‘TerroristDavindarCoverUp‘ असा हॅशटॅग वापरत हे सर्व प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

भाजपला 'या' राज्यातीलही सत्ता गमावण्याची भीती; म्हणून...

जम्मू-काश्‍मीरला भेट देण्यासाठी आलेल्या इतर देशांच्या राजदूतांना घेऊन जाण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देविंदरकडे होती. त्यामुळे तो कोणाच्या आदेशाखाली काम करीत होता? याची संपूर्ण चौकशी होणे आवश्‍यक आहे. दहशतवाद्यांना मदत करणे देशद्रोह आहे.  - प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस पक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What makes Modi and Shah gossip