रशियाची भारताविषयी काय भूमिका आहे

पीटीआय
गुरुवार, 16 जानेवारी 2020

इंडो-पॅसिफिक हा अमेरिकेचा डाव
आधी असलेली व्यवस्था मोडून काढण्यासाठी आणि चीनला शह देण्यासाठी अमेरिकेने भारत-प्रशांत (इंडो-पॅसिफिक) ही संकल्पना मांडल्याचा आरोप करत रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्जी लाव्हरोव्ह यांनी आज अमेरिकेवर जोरदार निशाणा साधला. सध्याच्या व्यवस्थेत अडचणी आणण्यासाठी आणि चीनला आव्हान देण्याच्या उद्देशाने अमेरिका, जपान आणि इतरांनी इंडो-पॅसिफिक ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. आशिया - प्रशांत विभागाला भारत - प्रशांत विभाग संबोधले जाण्यामागे नेमके काय कारण आहे. नव्या संकल्पनांबाबत आपण दक्ष असायलाच हवे. कारण, त्यामुळे विभाजन होता कामा नये. या संकल्पना सर्वसमावेशक असायला हव्यात, असे मत लाव्हरोव्ह यांनी या वेळी बोलताना मांडले.

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व भारताला मिळावे, अशी आमची भूमिका आहे, असे रशियाकडून आज स्पष्ट करण्यात आले. भारताच्या दौऱ्यावर असलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्जी लाव्हरोव्ह यांनी दिल्लीत बोलताना हे मत मांडले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, ही भारताची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीला पाठिंबा देताना लाव्हराव्ह म्हणाले की, सध्याच्या जागतिक विकासाच्या प्रक्रियेकडे पाहिल्यास असे दिसते की, आर्थिक शक्तिस्थाने आणि राजकीय प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या नव्या केंद्रांचा उदय होत असून, त्यापैकी भारत एक आहे. त्यामुळे सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व भारताला दिले जावे, अशी रशियाची भूमिका आहे.

ट्रम्प यांचा फेब्रुवारीत भारत दौरा शक्‍य

या वेळी बोलताना ते म्हणाले की, भारत आणि ब्राझीलला सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात यावे, अशी रशियाची भूमिका आहे. मागील काही वर्षांत भारताच्या परराष्ट्र धोरणात भारत - प्रशांत विभागावर मोठ्या प्रमाणात लक्ष्य केंद्रित करण्यात आले.

सूर्यापेक्षाही प्राचीन पदार्थाचा लागला शोध; शास्त्रज्ञांचा दावा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the role of Russia on India