'आप'चं पंजाब मॉडेल कसं असेल? केजरीवालांनी सांगितला अजेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind kejriwal corona positive
'आप'चं पंजाब मॉडेल कसं असेल? केजरीवालांनी सांगितला अजेंडा

'आप'चं पंजाब मॉडेल कसं असेल? केजरीवालांनी सांगितला अजेंडा

मोहाली : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं (AAP) पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पंजाबला नशामुक्त (Drugs Free) करण्याबरोबरच इतर महत्वाचे विकासाचे मुद्दे यंदा आपच्या प्रचाराचा भाग असणार आहेत. एकूणचं आपचं पंजाब मॉडेल (Punjab Model) कसं असेल? याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिली आहे. मोहाली येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. (What will be AAP Punjab model Arvind Kejriwal stated his parties agenda)

केजरीवाल म्हणाले, जर आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सत्तेत आली तर पंजाबला विकसित आणि समृद्ध बनवण्यासाठी १० सूत्रांचं 'पंजाब मॉडेल' तयार करण्यात आलं आहे. याद्वारे आम्ही असा समृद्ध पंजाब बनवू की रोजगारासाठी कॅनडामध्ये गेलेले पंजाबमधील तरुण पुढील पाच वर्षात मायदेशी परततील.

जर आपला लोकांनी मतदान केलं तर आम्ही पंजाबमधून ड्रग्जचं (Punjab Drugs) जाळ नष्ट करु. तसेच जलद न्याय सुनिश्चित करण्याबरोबरच पंजाब भ्रष्टाचारमुक्त केला जाईल. पंजाबमध्ये आम्ही १६,००० मोहल्ला क्लिनिक्स उभारू आणि इथं मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करु देऊ. तसेच इथल्या नागरिकांना दिवस-रात्र मोफत वीज पुरवली जाईल. तसेच १८ वर्षांवरील प्रत्येक महिलेला महिन्याला एक हजार रुपये मानधन देण्यात येईल.

तर 'आप'च्या मतांचं विभाजन होईल - केजरीवाल

दरम्यान, बलबिर सिंग राजेवाल यांच्या संयुक्त समाज मोर्चानं जर पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर ते हमखात 'आप'ची मत खातील, असा दावाही यावेळी केजरीवाल यांनी केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top