Farmers News : खराब झालेल्या गव्हाचीही खरेदी करणार; 'या' सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय

केंद्राच्या आदेशानुसार 'या' राज्याने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक होत आहे.
wheat
wheatgoogle

केंद्राने पंजाब आणि हरियाणामधून गहू खरेदीसाठी गुणवत्तेचे निकष शिथिल करून ६ टक्क्यांच्या मर्यादेच्या तुलनेत १८ टक्क्यांपर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, धान्य खरेदीवर मूल्यकपात लागू केली आहे. त्यामुळे आता खराब झालेल्या गव्हाचीही सरकार खरेदी करणार आहे.

पंजाब अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे की, एकसमान वैशिष्ट्यांनुसार धान्याची मर्यादा १८ टक्क्यांपर्यंत शिथिल केली जात आहे आणि प्रत्येकासाठी एक चतुर्थांश मूल्य कपात केली आहे.

wheat
Crime News : घृणास्पद! पतीनेच पत्नीचा अश्लील व्हिडीओ काढून केला व्हायरल; डोंबिवलीतला प्रकार

“पंजाबमधील शेतकऱ्यांना पेमेंट करताना राज्य सरकारने गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीतून (एमएसपी) २,१२५ रुपये प्रति क्विंटल वजा केले पाहिजेत. ६ टक्क्यांपर्यंत मुरलेल्या आणि तुटलेल्या गव्हावर मूल्यकपात लागू होणार नाही,’’ असं पत्रात नमूद केलं आहे.

wheat
Election 2023 : ; प्रचारासाठी कायपण! निवडणुकीसाठी 'नाटू नाटू' झालं 'मोदी मोदी'; पाहा व्हिडीओ

परंतु केंद्राने ५.३१ रुपये ते ३१.८७ रुपये प्रति क्विंटल मूल्यात कपात केली आहे. ६ ते ८ टक्क्यांपर्यंतच्या तुटलेल्या धान्यांसाठी प्रति क्विंटल ५.३१ रुपये आणि १०.६२ रुपयांच्या मूल्य कपातीसाठी ८ ते १० टक्के मूल्य कपात करण्यात आली आहे. हरियाणाच्या अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना तशाच प्रकारचं पत्र लिहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com