PM नरेंद्र मोदी कोणता मोबाईल वापरतात? जाणून घ्या खास गोष्टी

PM Narendra Modi Mobile: मोदीजी सामान्य लोकांसारखा कोणताही मोबाईल वापरू शकत नाहीत, कारण त्यामुळे त्यांची आणि राष्ट्राची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
PM Narendra Modi Mobile
PM Narendra Modi MobileSakal

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. ते वापरत असलेली कार, ज्या विमानातून ते प्रवास करतात ते विमान, त्यांचा कोट, त्यांचं खानपाण या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. पण मोदीजी कोणता फोन वापरतात, या प्रश्नाचे उत्तर बरेच लोक देऊ शकणार नाहीत आणि जे देतील आयफोन असेच देतील. तसं पाहिलं तर पंतप्रधान मोदीं आयफोनची वेगवेगळी मॉडेल्स वापरताना बऱ्याचदा पाहता येतं. परंतु हे मोबाईल मोदीजी कायम वापरत नाहीत. तुम्ही ऐकून चकीत व्हाल की पंतप्रधान मोदी आयफोन किंवा इतर कोणत्याही ब्रॅण्डच्या मोबाईलचा (Mobile) वापर करू शकत नाहीत. कारण त्यामुळे त्यांच्या सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. पंतप्रधानपद हे देशातील पद असल्यामुळे त्यांना सामान्य लोकांसारखे फोन वापरता येत नाहीत. तसे सामान्य कामांसाठी ते असे फोन वापरतात. पण तेही अतिशय सुरक्षित असतात. त्यांच्या फोनमध्ये विशिष्ट सॉफ्टवेअर असतात. (Which phone does Prime Minister Narendra Modi use?)

PM Narendra Modi Mobile
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात १२ करोड रुपयांची आलिशान मर्सिडीज कार

सॅटेलाईट किंवा रेस्ट्रिक्टेड एरिया फोन (Satellite or Restricted Area Phone)-

पंतप्रधानपद हे देशातील पद असल्यामुळे त्यांना सामान्य लोकांसारखे फोन वापरता येत नाहीत. तसे सामान्य कामांसाठी ते असे फोन वापरतात. पण तेही अतिशय सुरक्षित असतात. त्यांच्या फोनमध्ये विशिष्ट सॉफ्टवेअर असतात.असं नाही की मोदीजींकडे फोन नाही. त्यांच्याकडे फोन असतो मात्र तो स्पेशल डिझाईन फोन असतो. ते शक्यतो सॅटेलाईट किंवा रेस्ट्रिक्टेड एरिया फोन वापरतात. हे फोन खासकरून पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी डिझाईन केलेले असतात.

PM Narendra Modi Mobile
उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यात अलिशान कार! किंमत वाचून व्हाल थक्क

हॅक–ट्रॅक होऊ शकत नाही मोदींचा फोन (Modi's phone cannot be hacked)-

मोदीजी वापरत असलेले फोन कोणीही हॅक करून शकत नाही तसेच त्याला ट्रॅक करू शकत नाही. कारण हे फोन मिलिटरी फ्रिक्वेन्सीवर (Military Frequency) काम करतात. त्याचबरोबर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (National Technical Research Organization) तसेच DIETY AGENCY यांसारख्या संस्थांकडून या फोनची नियमित चाचणी केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com