BSP : बसपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सहा आमदारांना व्हीप जारी

BSP chief Mayawati
BSP chief Mayawati esakal
Summary

बसपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

राजस्थानमध्ये (Rajasthan) बहुजन समाज पक्षानं (BSP) राज्यात 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajasthan Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकलेल्या सर्व सहा आमदारांना व्हीप जारी केलाय. बसपाचे प्रदेशाध्यक्ष भगवान सिंह बाबा यांनी सांगितलं की, 'पक्षानं आमदार राजेंद्र सिंह गुढा, लखन सिंह, दीप चंद, जोगिंदर सिंह अवाना, संदीप कुमार आणि वाजिब अली यांना व्हीप जारी करण्यात आला. राज्यसभेत काँग्रेस (Congress) आणि भारतीय जनता पक्षाला (BJP) मतदान न करण्याचे आदेश या आमदारांना देण्यात आले आहेत.'

प्रदेशाध्यक्ष भगवान सिंह बाबा म्हणाले, 'या आमदारांनी पक्षाच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली होती, त्यामुळं आज बसपानं जारी केलेल्या व्हिपनुसार, त्यांना पक्षाचा नियम पाळणं बंधनकारक आहे. सध्या सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षानं ठरवलंय की, या निवडणुकीत बसपा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या धोरणांशी सहमत नसून त्यांनी उभं केलेल्या उमेदवारांना आमचा विरोध आहे. अशा स्थितीत बसपाचे आमदार अपक्ष उमेदवारालाच मतदान करतील.'

BSP chief Mayawati
कानपूर दंगलीवरून राजकारण तापलं; मायावती स्पष्टच म्हणाल्या, राष्ट्रपती-पंतप्रधानांनी..

...तर आमदारांवर कारवाई होणार : बसपा

प्रदेशाध्यक्ष बाबा पुढं म्हणाले, 'पक्षाच्या निर्णयाअंतर्गत या आमदारांना व्हीप जारी करण्यात आलाय. या आमदारांनी व्हीपचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. बसपाच्या या आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं प्रकरण न्यायालयात सुरू असून त्यांनी पक्षाच्या व्हिपचं उल्लंघन केल्यास, त्यांच्या विरोधात पक्ष कारवाई करेल.' दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत या आमदारांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती आणि नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com