
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील काही ट्विटर अकाउंटला अनफॉलो करण्याचे कारण आता व्हाईट हाऊसने दिले आहे. व्हाइट हाउसने स्पष्ट केले आहे की, व्हाईट हाऊसचे ट्विटर अकाऊंट हे शक्यतो अमेरिकेचे राष्ट्रपती जेव्हा विदेश दौऱ्यावर असतात, त्यावेळी त्या देशातील महत्वाच्या व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट्स फॉलो केले जातात. जेणेकरुन त्यांना त्यांचे ट्विट्स फॉलो करणे सोपे जाईल. दौरा संपल्यानंतर मात्र, त्या ट्विटर अकाऊंटला अनफॉलो करण्यात येते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यावर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भारतातील राष्ट्रपतीसह अनेक अकाऊंटसना फॉलो करण्यात आले होते. त्या अकाऊंट्सना आता मात्र, अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा कुठलाही दौरा नसल्याने भारतातील महत्वाच्या व्यक्तींच्या अकाऊंट्सना अनफॉलो करण्यात आले असल्याचे माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे.
जगभरातील निम्म्या कामगारांचा रोजगार जाणार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा इशारा
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील काही ट्विटर अकाउंट्सना फॉलो करण्यात आले होते. पण, आता अचानक काही दिवसांमध्येच व्हाइट हाउसने मोदींसह सर्व भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केले, त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते.
एअर इंडियाचा मोठा निर्णय; या तारखेपासून सुरु करणार विमानसेवा
भारताने कोरोना विरोधातील लढ्यासाठी अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ११ एप्रिल रोजी व्हाइट हाउसच्या ट्विटर हँडलने अनेक भारतीय ट्विटर हँडल फॉलो केले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास यांच्या ट्विटर हँडलचा समावेश होता. यासोबत व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून फॉलो केले जाणारे मोदी जगातील पहिले नेते ठरले होते. पण, फॉलो केल्यानंतर तीन आठवड्यांमध्येच आता अचानक व्हाइट हाउसने सर्व भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केले. परंतु त्यावर व्हाईट हाऊसकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण हे वेगळेच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.