esakal | कोण आहेत यावर्षीचे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

bolsonaro

ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यासाठी निमंत्रण दिले होते. अध्यक्ष बोल्सेनारो यांचा भारत दौरा शुक्रवारपासून (ता. २४) सुरू होणार असून, सोमवारी (ता. २७) ते मायदेशी रवाना होतील.

कोण आहेत यावर्षीचे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे वाचा

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यासाठी निमंत्रण दिले होते. अध्यक्ष बोल्सेनारो यांचा भारत दौरा शुक्रवारपासून (ता. २४) सुरू होणार असून, सोमवारी (ता. २७) ते मायदेशी रवाना होतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्राझीलच्या निमित्ताने दक्षिण अमेरिका खंडातील देशांशी संबंध वृद्धिंगत करण्यास भारताने प्राधान्य दिले असून, त्या अंतर्गत ब्राझीलच्या अध्यक्षांना प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्यासमवेत येणाऱ्या शिष्टमंडळात सात मंत्री, तेथील संसदेतील ब्राझील-भारत मैत्री गटाचे प्रमुख तसेच अधिकारी आणि उद्योजकांचाही समावेश असेल. अध्यक्ष बोल्सेनारो २७ जानेवारीला भारतीय-ब्राझील उद्योजक मंचाच्या व्यासपीठावरून दोन्ही देशांच्या उद्योजकांशी संवादही साधतील.

लहानपणापासून एकत्र असलेले आयपीएस दाम्पत्य आता... 

भारत आणि ब्राझीलदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार २०१८-१९ मध्ये ८.२ अब्ज डॉलरपर्यंत पोचला आहे. यात ३.८ अब्ज डॉलरची भारताकडून ब्राझीलला निर्यात केली जाते.

जवानांनी गर्भवती महिलेला 6 किमी चालत पोहचविले रुग्णालयात

ब्राझीलमध्ये भारताची गुंतवणूक सहा अब्ज डॉलरची आहे, तर ब्राझीलची भारतातील गुंतणूक १ अब्ज डॉलरपर्यंत आहे. अध्यक्ष बोल्सोनारो यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

loading image