कोण आहेत ९८ वर्षीय माखनलाल सरकार ? सुवेंदूंच्या शपथविधीआधी PM मोदी पडले पाया, वाकून केला नमस्कार

PM Modi Greeted Makhanlal Sarkar सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर पोहोचताच त्यांनी माखनलाल सरकार यांना नमस्कार केला. यावेळी मोदी भावुक झाल्याचंही दिसून आलं.
Who Is Makhanlal Sarkar PM Modi Touched His Feet

Who Is Makhanlal Sarkar PM Modi Touched His Feet

Esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आज भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. ब्रिगेड परेड मैदानावर भव्य अशा शपथविधी सोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर पोहोचताच त्यांनी माखनलाल सरकार यांना नमस्कार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माखनलाल सरकार यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला आणि नंतर गळाभेटही घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह माखनलाल सरकारही भावुक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com