

biography of IIT Baba Abhay Singh and wife
esakal
Abhay Singh wife Preetika : प्रयागराज येथील महाकुंभात ‘IIT बाबा’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यामागचे कारण त्यांचे लग्न आहे. अभय सिंह आता एकटा नसून पत्नी प्रीतिका याच्यासोबत दिसत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हिमाचल प्रदेशात त्यानी विवाह केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर दोघे हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील अभय यांच्या मूळ गावी सासरोली येथे पोहोचल्यावर त्यांच्या लग्नाची चर्चा अधिक रंगली. या पार्श्वभूमीवर अभय सिंह आणि त्यांची पत्नी प्रीतिका कोण आहेत, तसेच दोघांचे शैक्षणिक शिक्षण काय आहे, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.