
Supreme Court Chaos as Lawyer Throws Shoe at CJI BR Gavai
Esakal
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एका वकिलाने सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बूट सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयात गोंधळ उडाला. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ वकील राकेश किशोर याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांकडे सोपवलं. ७२ वर्षीय राकेश किशोर या वकिलाला आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही. तुरुंगात जायचीही तयारी असल्याचं त्याने म्हटलंय.