कोण आहेत ऋतब्रत बॅनर्जी? TMCत फूट पाडत थेट ममतांना आव्हान; पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्नटमुळे चर्चेत

Mamata Banerjee Latest News ऋतव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे ५८ आमदार एकत्र आले आहेत. ऋतव्रत हे आपले नेते असल्याचे पत्र या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे.
Mamata Banerjee Faces Fresh Political Challenge in Bengal

Mamata Banerjee Faces Fresh Political Challenge in Bengal

Esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. टीएमसीने निलंबित केलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. आता त्यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही मंजुरी मिळालीय. तर ऋतब्रत यांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच पक्षाच्या सल्लागार असल्याचं म्हटलंय. दरम्यान, २०२२मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीप्रमाणे पश्चिम बंगालमधील या घडामोडी घडत असल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. ऋतव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे ५८ आमदार एकत्र आले आहेत. ऋतव्रत हे आपले नेते असल्याचे पत्र या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना दिले. Mamata Banerjee Faces Fresh Challenge as Ritabrata Banerjee Gains Support of 58 TMC Legislators

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com