

Samrat Chaudhary journey from early setback to Bihar CM post explained
Esakal
बिहारला २० वर्षांनी नितीशकुमार यांच्यानंतर नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. तर जदयूच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. नितीशकुमार राज्यसभेवर गेल्यानं बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला. यानंतर भाजप आमदारांच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची गटनेते पदी निवड केली गेली. आज त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कमी वयात मंत्री झालेल्या सम्राट चौधरींना भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळेच मंत्रिपदावरून हटवण्यात आलं होतं. आता त्याच भाजपचे मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचा कारभार सांभाळणार आहेत. Who is Samrat Chaudhary