माझ्यावर गोळ्या झाडणारे गोडसेचे वंशज - असदुद्दीन ओवेसी

ओवेसी यांच्यावर नियोजनबद्धपणे हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiटिम ई सकाळ

उत्तर प्रदेशात खासदार व एमआयएम अध्यक्ष असुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर काही दिवसांपुर्वी हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर ओवेसी यांच्यावर नियोजनबद्धपणे हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर या हल्ल्याचा मोठ्याप्रमाणात निषेध करण्यात आला. आता संभलमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेवर भाष्य करत सरकारवर ताशेरे ओढले.

Asaduddin Owaisi
Karnataka : हिजाब वादात आता पाकिस्तानच्या मलालाची उडी

ओवेसी म्हणाले,“मुख्यमंत्र्यांनी सर्व गुन्हे संपवले, आता ते करायला सगळे घाबरले आहेत, गुन्हेगार आणि माफिया पळून गेले आहेत. मग माझ्यावर गोळ्या झाडणारे कोण होते? HM आणि PM म्हणतात की आता माफिया तुरुंगात जातात मग गोळ्या झाडणारे कोण होते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर ओवेसी आणखी म्हणाले, “ते गोडसेचे वंशज आहेत. गांधींची हत्या करणाऱ्यांसारखीच मानसिकता असलेले ते लोक आहेत. आंबेडकरांच्या संविधानाचा अनादर करू पाहणारे तेच आहेत. त्यांचा कायद्याच्या राज्यावर विश्वास नाही तर बंदुकीच्या राज्यावर आहे. त्यांचा मतपत्रिकांवर विश्वास नाही तर बुलेटवर विश्वास आहे”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com