
धनदांडगे लोक थेट सर्वोच्च न्यायालयात कसे येतात? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दिलासा मागण्यासाठी श्रीमंत थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात यावरून नाराजी व्यक्त केली. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांच्या मुलाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. तुमच्या प्रकरणांची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे आणि तुम्ही उच्च न्यायालयात जा असं स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने बघेल पिता,पुत्रांना सांगितलं. छत्तीसगढमधील कथित दारू घोटाळा आणि इतर प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.