एक्झिट पोलचे अंदाज सपशेल अपयशी का ठरले? तज्ज्ञ काय सांगतात...

जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण, एक्झिट पोलचे अंदाज सपशेल अपयशी ठरल्याचं चित्र आहे.
Why did exit polls fail miserably What experts say assembly election result 2023
Why did exit polls fail miserably What experts say assembly election result 2023eSakal

नवी दिल्ली- रविवारी चार राज्यांच्या निकाल जाहीर झाले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेत येईल. एक्झिट पोलमध्ये, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

तसेच जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण, एक्झिट पोलचे अंदाज सपशेल अपयशी ठरल्याचं चित्र आहे. (Why did exit polls fail miserably What experts say assembly election result 2023 )

Why did exit polls fail miserably What experts say assembly election result 2023
Mizoram Assembly Election 2023 Results LIVE : दोनच तासांमध्ये पहिला निकाल हाती, झेडपीएमने उघडलं खातं..

तेलगंणामध्ये काँग्रेस बहुमताजवळ जाईल किंवा काँग्रेस-बीआरएस यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे तेलंगणा काही प्रमाणात एक्झिट पोल निकालाच्या जवळपास गेल्याचं म्हणता येईल. मात्र, तीन राज्यात अंदाज पूर्णपणे चुकले. त्यामुळे एक्झिट पोलच्या विश्वासहार्यतेवर शंका व्यक्त केली जातीये.

याच विषयी आम्ही मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागचे माजी विभागप्रमुख डॉ. संजय रानडे यांच्याशी संवाद साधला. एक्झिट पोलचे अंदाज का चुकले याबाबत त्यांना बोलतं केलं.

एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे का ठरले?

संजय रानडे म्हणाले की, एक्झिट पोलचा सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी आपल्या निकषांत बदल करण्याची गरज आहे. कारण एक्झिट पोलचे निकाल खऱ्या निकालाच्या जवळपास देखील नव्हते. सर्व्हे घेणाऱ्या संस्थांनी आपल्या सॅम्पल साईजमध्ये (सर्व्हेमध्ये सहभागी मतदारांची संख्या) वाढ करण्याबाबत विचार करावा.

तसेच कोणत्या वयोगटातील नागरिकांचे मत विचारले जाताहेत, कोणत्या भागात मतदारांना प्रश्न विचारले जाताहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाताहेत यावरुन पुन्हा एकदा आत्मपरिषण करण्याची गरज आहे.

Why did exit polls fail miserably What experts say assembly election result 2023
Election Results: फडणवीस प्रचाराला गेले तेथे पक्षाला चांगले यश; भारत जोडो अपयशी ठरल्याचा भाजप नेत्याचा दावा

एक्झिट पोलवरचा विश्वास उडेल!

एक्झिट पोलचे सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्था आणि पत्रकार यांचा ग्राऊंड रिअॅलिटीशी संपर्क तुटत चाललंय याचे हे निदर्शक आहे. पत्रकारांनाही तीन राज्यांतील निवडणुकांच्या निकालाचा अंदाज बांधता आला नाही. केवळ एक्झिट पोल पाहून आपले मत ठरवणाऱ्या नागरिकांसाठी निकाल अनपेक्षित आहे.

असे असले तरी भारतीय नागरिक एक्झिट पोलबाबत कायम उत्सुक असतील. कारण, राजकारणात कोणता पक्ष निवडून येईल? सिनेमा चालेल का? क्रिकेट सामन्यात कोणाचा विजय होईल? अशा प्रशांची उत्तरं जाणून घेण्यात भारतीयांना नेहमीच रस राहिला आहे, असं रानडे म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com