Year End : आर्थिक वर्ष ३१ डिसेंबरला न संपता ३१ मार्चला का संपतं ?

आर्थिक वर्षाचा कालावधी ब्रिटिशांनी १८६७मध्ये ठरवला. त्यांनी इंग्लंडप्रमाणेच भारताचेही आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे ठेवले.
financial year
financial year google

मुंबई : आज भारतीय आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. पण तुम्हाला माहितीये का आर्थिक वर्ष हे कॅलेंडर वर्षाप्रमाणे ३१ डिसेंबरला न संपता ३१ मार्चला का संपतं ?

ब्रिटीश काळापासून ही प्रथा चालत आली आहे. आपलं कॅलेंडरमधील वर्ष जानेवारीत सुरू होतं आणि डिसेंबरमध्ये संपतं. आर्थिक वर्षाचं मात्र तसं होत नाही. ते एप्रिलमध्ये सुरू होऊन मार्चमध्ये संपतं. (why financial year ends on 31st march why financial year starts on 1st april )

त्यामुळे ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या संस्था आपला आर्थिक लेखाजोखा तयार करून नफ्या-तोट्याचं गणित जुळवतात. तसंच १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षासाठी आर्थिक तरतूदही केली जाते. हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

financial year
Early Retirement : अवघ्या चाळीशीत व्हा निवृत्त आणि जगा निवांत; पैशांचीही कमतरता नसेल

दरवर्षी सरकार अर्थसंकल्प सादर करतं. हा अर्थसंकल्प १ एप्रिलपासून लागू होतो. या एप्रिल ते मार्च या काळात सरकारी तिजोरीत किती पैसे जमा झाले आणि किती खर्च झाला याचा हिशोब मांडून देशाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे या काळाला आर्थिक वर्ष असे म्हणतात.

आर्थिक वर्षाचा कालावधी ब्रिटिशांनी १८६७मध्ये ठरवला. त्यांनी इंग्लंडप्रमाणेच भारताचेही आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे ठेवले. ब्रिटीश गेल्यानंतरही हीच पद्धत सुरू राहिली.

भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे कृषी क्षेत्राचाही विचार आर्थिक वर्ष ठरवताना झालेला दिसतो. मार्चअखेरपर्यंत रब्बीचा हंगाम संपत येतो व कृषीक्षेत्रातील व्यवहारांचा अंदाज सरकारला येतो. तसेच जूनपासून सुरू होणाऱ्या मोसमी पावसाचे पुर्वानुमानही एप्रिलमध्ये येते. अशा वेळी आर्थिक गणितं जुळवणं सोपं जातं.

financial year
Government Scheme : करा फक्त ५० रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा ३५ लाखांचा परतावा

भारत हा सणांचा देश आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे राहात असल्यामुळे सतत काही ना काही सण-उत्सव सुरू असतात. सप्टेंबर ते डिसेंबर या काळात दिवाळी, नाताळसारखे अनेक मोठे सण साजरे होतात.

सणांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असल्याने बाजारात बरीच आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे लगेच ३१ डिसेंबरपर्यंत आर्थिक लेखाजोखा मांडण कठीण असतं.

या सर्व कारणांमुळे भारतातील आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपून १ एप्रिलला सुरू होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com