हिंदी दिन का साजरा केला जातो? काय आहे हिंदीचं महत्त्व?

हिंदी दिन का साजरा केला जातो? काय आहे हिंदीचं महत्त्व?

भारत हा असा एकमेव देश आहे, जिथे हजारो भाषा बोलल्या जातात. तसेच प्रत्येक भाषेत सुद्धा वेगवेगळ्या बोली आणि प्रकार असलेले आढळून येतात. इतकी समृद्ध विविधता असूनही भारतात एकता नांदताना दिसून येते. भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी होय. या हिंदी भाषेच्या सन्मानाकरिता तसेच हिंदी भाषेतलं सौंदर्य, त्यामधील साहित्य जगासमोर आणण्यासाठी 14 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस (Hindi Diwas) म्हणून साजरा केला जातो.

हिंदी दिन का साजरा केला जातो? काय आहे हिंदीचं महत्त्व?
मोठी बातमी! 'कोव्हॅक्सिन'ला या आठवड्यात WHOची मिळणार मंजुरी

याच दिवशी का साजरा केला जातो हिंदी दिन?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढच्या 2 वर्षांतच म्हणजेच 14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने हिंदी भाषेची भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचं औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात प्रदेशागणिक जशी संस्कृती बदलत जाते, अगदी त्याचप्रमाणे भाषादेखील बदलते मात्र; उत्तर भारतासह बहुसंख्य राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. राष्ट्रीय हिंदी दिवसाचं निमित्त साधून देशभरातील सरकारी कार्यालयांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. भारतामध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी तत्कालीन सरकार विशेष प्रयत्न करत होतं. मात्र, देशातील काही राज्यांकडून याला विरोध करण्यात आला. या विरोधानंतर हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. यासोबतच इंग्रजीला देखील राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे भारताची कोणतीही एक राष्ट्रभाषा नाही.

हिंदी भाषेबद्दल काही रंजक गोष्टी

  • पहिला हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953 दिवशी साजरा करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी भाषेचे महत्त्व ओळखून हा दिवस साजरा केला.

  • जगात 10 जानेवारी दिवशी 'विश्व हिंदी दिवस' देखील साजरा केला जातो.

  • भारतामध्ये हिंदी भाषेला असलेला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी इंग्रजी हटवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या पार्श्वभूमीवर देशात आंदोलन सुरू झाली. तामिळनाडूमध्ये जानेवारी 1965 मध्ये भाषावादावरून दंगली देखील पेटल्या होत्या.

  • हिंदी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये टॉप 5 भाषांमध्ये हिंदीचाही समावेश आहे.

  • भारतामध्ये 43.63% लोकं हिंदी बोलतात. आणि देशात हिंदी भाषिकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

  • 2001 मध्ये हा आकडा 41.3 टक्के होता. तेंव्हा 42 कोटी लोक हिंदी बोलायचे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार, 2001 ते 2011 च्या दरम्यान हिंदी बोलणाऱ्यांची संख्या 10 कोटींनी वाढली. याचा अर्थ स्पष्ट आहे की, हिंदी बोलणाऱ्यांची संख्या गतीने वाढत आहे.

  • 2017 मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये पहिल्यांदा 'अच्छा', 'बड़ा दिन', 'बच्चा' और 'सूर्य नमस्कार' यांसारख्या हिंदी शब्दांचा समावेश केला गेला.

  • 2021 साली इंटरनेटवर इंग्रजीच्या तुलनेत हिंदीचा वापर करणार्‍यांची संख्या वाढू शकते. सुमारे 20.1 कोटी लोकं हिंदीचा वापर करू शकतात. गूगलच्या माहितीनुसार, हिंदी भाषेत माहिती वाचणारे प्रतिवर्षी 94% नी वाढत आहेत तर इंग्रजी वाचणार्‍यांचा दर 17% आहे.

  • दक्षिण पॅसिफिक मधील मेलानेशिया मधील फिजी नावाच्या आयलंडची हिंदी ही आधिकारिक भाषा आहे. त्याचा लहेजा अवधी, भोजपुरीप्रमाणे आहे.

  • 1918 साली महात्मा गांधी यांनी हिंदी साहित्य संमेलनामध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषा बनवण्याचा मानस बोलून दाखवला होता.

  • जगात पाकिस्‍तान, नेपाळ, बांग्‍लादेश, संयुक्‍त अरब अमीरात, अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, न्‍यूजीलैंड, युगांडा, गुयाना, सूरीनाम, त्रिनिदाद, मॉरिशस, साउथ अफ्रीका समवेत अनेक देशांत हिंदी भाषिक आढळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com