
दोन आठवड्यांपूर्वी २२ एप्रिल २०२५ रोजी भारताला धक्का बसला. जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले, यात २५ भारतीय एका नेपाळच्या नागरिकाचा समावेश होता. त्यातही बरेच पर्यटक होते.
या घटनेने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. त्यानंतर पाकिस्तानविरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर भारतातूनही त्वरित कारवाईला सुरूवात झाली आहे.