
नांदणीच्या मठातील महादेवी हत्तीला गुजरातच्या 'वनतारा'कडे हस्तांतर केल्यानंतर महादेवी आता गुजरातमध्ये पोहोचलीय. गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर वनतारामध्ये तिचं स्वागत करण्यात आलं. महादेवी हत्तीण माधुरी नावानेही ओळखली जात होती. वनताराने महादेवी दाखल झाल्यानंतरचे काही फोटो शेअर केले असून तिला दीर्घकालीन वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचा दावा करण्यात आलाय.